जळगावात उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडलं, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जळगावच्या आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार रवींद्र चौधरी यांचा मृत्यू झाला.

जळगावात उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडलं, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalgaon

जळगाव: जळगाव शहरात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार रवींद्र छबुलाल चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र हे एका खासगी वित्त कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उड्डाणपुलावर नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र चौधरी हे दुचाकीवरून आपल्या कामाच्या ठिकाणी जात होते. यावेळी जळगावमधील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ते ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची तीव्रता मोठी असल्याने घटनास्थळी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.

घरातील एकमेव कमावती व्यक्ती गमावली

रवींद्र चौधरी हे कुटुंबाचा आर्थिक आधार होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर मोठं संकट ओढवलं आहे. घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आता कुटुंबासमोर भावनिक दुःखासोबतच आर्थिक आव्हानही उभं राहिलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच रवींद्र यांचे नातेवाईक आणि कार्यालयातील सहकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचले. आपल्या जवळच्या व्यक्तीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नातेवाइकांना मोठा धक्का बसला. रुग्णालयातील त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number