कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६चे निकाल अखेर जाहीर झाले असून, या निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे ठरवणाऱ्या या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल स्पष्टपणे बदलत्या राजकीय वास्तवाकडे निर्देश करणारा ठरला आहे. एकूण ६८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे.
२०१७ च्या तुलनेत २०२६ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदललेले दिसून आले. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने १५ जागा जिंकत आपली ताकद कायम ठेवली, तर भाजपने १२ जागांवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाने ९ जागा जिंकल्या असून, उबाठा गटाला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांना मिळून १० जागा मिळाल्या आहेत.
या निकालांवरून कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे अध्यक्षपद जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पंचायत समित्या, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आणि शेतीपूरक विकास यांसारख्या विषयांवर येत्या काळात कोणती दिशा ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्या, जनसुराज्य, यड्रावकर गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष उमेदवारांनीही आपली ताकद दाखवून दिली. काही पारंपरिक गड ढासळले, तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांनी संधी साधली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
-
शित्तूर तर्फे वारुण – सर्जेराव पाटील-पेरीडकर (जनसुराज्य)
-
सरूड – अमर पाटील (शिवसेना)
-
बांबवडे – राजकुंवर गायकवाड (राष्ट्रवादी)
-
आंबार्डे – स्नेहल वेल्हाळ (जनसुराज्य)
-
सातवे – डॉ. जयंत पाटील (राष्ट्रवादी)
-
कोडोली – अमरसिंह पाटील (अपक्ष)
-
पोर्ले तर्फे ठाणे – भगवान पाटील (राष्ट्रवादी)
-
यवलुज – पुजा पाटील (राष्ट्रवादी)
-
कोतोली – वर्षाराणी पाटील (शिवसेना)
-
कळे – शोभा बेलेकर (जनसुराज्य)
-
घुणकी – शुभांगी महेश कुंभार (काँग्रेस)
-
भादोले – सोनाली सावंत (काँग्रेस)
-
कुंभोज – शितल यादव (जयसुराज्य)
-
आळते – वर्षा सावर्डेकर (शिवसेना)
-
शिरोली – सलीम महात (भाजप)
-
रुकडी – अतिश शिंगे (शिवसेना)
-
रुई – राहुल आवळे (काँग्रेस)
-
कोरोची – सानिका आवडे (भाजप)
-
कबनूर – कुमार कांबळे (भाजप)
-
पट्टीणकोडोली – महेश पाटील (भाजप)
-
रेंदाळ – शिवाजी जाधव (शिवसेना)
-
दानोळी – नंदिनी संदीप कांबळे (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
-
उदगाव – अमोल चव्हागण (यड्रावकर गट)
-
आलास – प्रशांत शहापुरे (भाजप)
-
नांदणी – प्राचिता कोळी (यड्रावकर गट)
-
यड्राव – अर्चना चौगुले (काँग्रेस)
-
अब्दुललाट – श्रद्धा गायकवाड (शिवसेना)
-
दत्तवाड – मृणालीनिराजे जाधव-पाटील (शिवसेना)
-
कसबा सांगाव – सुवर्णा कांबळे (राष्ट्रवादी)
-
सिद्धनेर्ली – सुशया घाटगे (भाजप)
-
बोरवडे – शोभाताई फराकटे (राष्ट्रवादी)
-
म्हाकवे – काकासाहेब सावडकर (भाजप)
-
चिखली – शिवानी भोसले (भाजप)
-
कापशी – शिल्पा खोत (राष्ट्रवादी)
-
शिये – विश्वनाथ पाटील (काँग्रेस)
-
वडणगे – इंद्रजीत पाटील (शिवसेना)
-
उचगांव – नामदेव वाईंगडे (भाजप)
-
मुडशिंगी – तानाजी पाटील (भाजप)
-
गोकुळ शिरगांव – सुदर्शन खोत (काँग्रेस)
-
पाचगांव – संग्राम पाटील (काँग्रेस)
-
कळंबे तर्फ ठाणे – विनिता भोगम (भाजप)
-
पाडळी खुर्द – सुर्यवंशी गुंडाप्पा (राष्ट्रवादी)
-
शिंगणापूर – रसिका पाटील (काँग्रेस)
-
सांगरूळ – रेखाताई मुगडे (राष्ट्रवादी)
-
सडोली खालसा – क्रांतिसिंह पाटील (राष्ट्रवादी)
-
निगवे खालसा – एकनाथ पाटील (काँग्रेस)
-
तिसंगी – सोनाली विलास पाटील (काँग्रेस)
-
असळज – संभाजी पाटणकर (काँग्रेस)
-
राशिवडे बु. – सागर धुंदरे (काँग्रेस)
-
कसबा तारळे – अमृता डोंगळे (राष्ट्रवादी)
-
कसबा वाळवे – अरुण जाधव (शिवसेना)
-
सरवडे – संयोगिता मोरे (काँग्रेस)
-
राधानगरी – अभिजित तायशेटे (काँग्रेस)
-
गारगोटी – रेश्मा देसाई (काँग्रेस – शिव-शाह आघाडी)
-
पिंपळगाव – रोहिणी आबिटकर (शिवसेना)
-
आकुर्डे – अर्चना निकम (शिंदे गट)
-
कडगाव – सारिका नांदेकर (शिंदे गट)
-
उत्तुर – शिरीष देसाई (राष्ट्रवादी)
-
पेरणोली – देसाई राजाराम (स्थानिक आघाडी)
-
कसबा नुल – अनिरुद्ध रेडेकर (जनसुराज्य शक्ती)
-
हलकर्णी – शिवशंकर हत्तरकी (राष्ट्रवादी)
-
भडगांव – अमरसिंह चव्हाण (राष्ट्रवादी)
-
गिजवणे – शैलजा पाटील (राष्ट्रवादी)
-
नेसरी – संग्रामसिंह देसाई (राष्ट्रवादी)
-
अडकूर – राजश्री गावडे (भाजप)
-
माणगाव – मानसी भोगण (राष्ट्रवादी)
-
कुदनुर – विद्या पाटील (राष्ट्रवादी)
-
तुडये – रचना गावडे (राष्ट्रवादी)
या निकालांनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून, अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची राजकीय चढाओढ लवकरच रंगताना दिसणार आहे.