ऐन ऑक्टोबर महिन्यात ‘या’ भागांत पावसाच्या सरी बरसणार? तर काही जिल्ह्यांना तीव्र उकाड्याचा तडाखा

राज्यात आज बहुतांश भागांत हवामान उष्ण तर काही ठिकाणी हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता आहे.

ऐन ऑक्टोबर महिन्यात ‘या’ भागांत पावसाच्या सरी बरसणार? तर काही जिल्ह्यांना तीव्र उकाड्याचा तडाखा
maharashtra weather update

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील बहुतांश भागांत सध्या उष्ण आणि कोरडे हवामान कायम असले, तरी आगामी दोन ते तीन दिवसांत काही जिल्ह्यांत अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवला असून आज, सोमवार पहाटेपासून हलका गारवा हवेत जाणवू लागल्याने नागरिक सुखावले आहे.

सध्या कोकणात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा परिसरात हवामान कोरडे राहण्याची अधिकची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची अधिकची शक्यता आहे.

हेही वाचा : धक्कादायक! कौटुंबिक वादाचा दुखःद शेवट, महिलेसह तीन वर्षांच्या चिमुकल्याला दगडाने ठेचून मारले; संशयित पती ताब्यात

दरम्यान, मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोरडं वातावरण राहण्याची शक्यता वर्तविली आहे. तर विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number