देवगडमधील समुद्रात मोठी दुर्घटना! बोटीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; तब्बल 25 खलासी…

Malvan Boat Fire : सिंधुदुर्गमधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. देवगडच्या समुद्रात मालवणच्या भगवती बोटीला अचानक आग लागलेली आहे. सुदैवाने या बोटीवर असलेले तब्बल 25 खलासी सुखरुप बचावले आहेत.
मालवण बोट दुर्घटना
Devgad Boat Fire

सिंधुदुर्गमधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. देवगडच्या समुद्रात मालवणच्या भगवती बोटीला अचानक आग लागलेली आहे. सुदैवाने या बोटीवर असलेले तब्बल 25 खलासी सुखरुप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवण येथील मच्छीमार गोपी तांडेल यांच्या मालकीची भगवती ही नौका मासेमारीसाठी देवगड समु्द्रात गेलेली होती. मासेमारी सुरु असतानाच बोटीच्या इंजिनमधील वायरिंगमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले आणि आगीने क्षणातच भडका घेतला. बोटीला आग लागल्याचे लक्षात येताच सर्व खलाशांमध्ये एकच धावपळ उडाली.

खलाशांनी तातडीने मदतीसाठी संपर्क साधला. जवळच असलेल्या अन्य बोटी आणि तटरक्षक दलाच्या मदतीने सर्व खलाशांना वेळेमध्येच बाहेर काढण्यात आले. आगीमुळे या बोटीचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version