महाराष्ट्रात सर्वात आवडती आणि प्रसिद्ध अशी योजना ठरली ती 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'. विधासभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणली. आणि ती योजना महायुती सरकारसाठी फायदेशीर देखील ठरली. परंतु आता काही लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होण्याचे काम सुरु असल्याने काही लाडक्या बहिणींमध्ये धाकधूक वाढलीय. अशातच आता बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार टीका केलीय.
Manikrao Kokate :Maha Shivratri 2025: महाशिवरात्रीला संपूर्ण दिवस भद्रा, जल अर्पण करण्यासाठी 'हा' आहे शुभ मुहूर्त
काय म्हणाले बच्चू कडू?
'लाडक्या बहिणींसाठी कोर्टात धाव घेऊ आणि लाडक्या बहिणींसाठी लढू, असं बच्चू कडू म्हणालेत. राज्यात बहिणींचे अर्ज अपात्र होत आहेत. हे सरकार लाडक्या बहिणींवर अन्याय करत आहेत. ही बेईमानी आहे. अपात्र झालेल्या बहिणींना घेऊन आम्ही तक्रार दाखल करणार आहोत', असं बच्चू कडू म्हणालेत.
'निवडणुकीआधी महायुती सरकारनं सरसकट सगळ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. मात्र, मतदान झालं, महायुतीचं सरकार आलं, आता सरकार अर्जांची छाननी करत आहेत. हे चुकीचं आहे. मतदानाच्या आधी घाईघाईत अर्ज न तपासता अनुदान दिलं, पण आता अर्ज बाद करत आहेत'. सरकार फसवणूक करत आहेत. मतदानापूर्वी खिशातले पैसे न देता तिजोरीतले पैसे देऊन सरकारनं भ्रष्टाचार केला आहे. यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू. वेळ आली तर, कोर्टात सुद्धा जाऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिलाय.