नागपूर, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार होणार आहे. २० मार्चपासून उमदेवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली. २७ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आहे. परंतु यामध्ये शनिवार, रविवार व सोमवारी धुलीवंदनाची सुटी असल्याने उमदेवारीसाठी दोनच दिवस मिळणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छूक उमेदवारांची धावाधाव होणार आहे.