Monday, June 23, 2025 06:32:52 AM

लग्नाला निघालेली स्कॉर्पिओ उलटली

लग्नाला निघालेली स्कॉर्पिओ उलटली

नागपूर, प्रतिनिधी, दि. २१ एप्रिल २०२४ : नागपुमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. लग्न समारंभाला स्कॉर्पिओने निघालेलय वऱ्हाडाचा भीषण अपघात घडला आहे. लग्न समारंभाला जाणारी भरधाव स्कॉर्पिओ उभ्या कारवर आदळून उलटल्याने एक दाम्पत्य ठार झालं आहे. तर एकाच कुटुंबातील पाच जणांसह, स्कॉर्पिओ चालक असे सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास बुटीबोरी परिसरात घडली.

राजेश मुरारीलाल श्रीवास्तव (वय ५२) आणि पूजा राजेश श्रीवास्तव (वय ४५, दोन्ही रा. रामनगर, वर्धा) अशी मृतकांची नावं आहेत. जखमींमध्ये राणी श्रीवास्तव (वय ६३), अमन श्रीवास्तव (वय २६), संगीता श्रीवास्तव (वय ४८), राकेश श्रीवास्तव (वय ५२ सर्व रा. रामनगर, वर्धा) आणि चालक सारंग गोल्हर (वय २६ रा. धामणगाव - वाठोडा) याचा समावेश आहे. जखमींवर बुटीबोरीतील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

                 

सम्बन्धित सामग्री