Sunday, August 17, 2025 03:57:26 PM

Pune Shivshahi Bus Case : आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेने संताप व्यक्त केला जातोय.

pune shivshahi bus case  आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेने संताप व्यक्त केला जातोय.  स्वारगेट बस स्थानक परिसराच्या आवारात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये  दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अत्याचार करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर धक्कादायक म्हणजे याच बंद शिवशाही बसमध्ये मोठ्या संख्येने महिलांच्या साड्या आणि काँडम्स आढळून आले. दरम्यान आता या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ही कोठडी सुनावण्यात आलीय. दरम्यान यानंतर सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलोंनी आपापली बाजू मांडलीय. 

हेही वाचा: Kiara Advani Pregnant: कियारा- सिद्धार्थच्या आयुष्यात येणार गोड गिफ्ट

काय म्हणाले आरोपीचे वकील? 
आरोपीने जबरदस्ती केली नाही 
दोघांच्या संमतीने झाले 
गुन्हे सिद्ध झालेले नाहीत
2 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी 

काय म्हणाले सरकारी वकील? 
आरोपीवर 6 गुन्हे दाखल 
आरोपीकडून 2 वेळा लैंगिक अत्याचार 
5 गुन्ह्यात महिला तक्रारदार 
14 दिवसांची पोलीस कोठडी हवी 

हेही वाचा:  Instant Rice Recipes तांदळापासून बनणाऱ्या झटपट रेसिपी

पुणे कोर्टात नेमकं काय घडलं; सरकारी वकील युक्तिवाद

आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते आहे.या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपचा आहे.आरोपी सराईत असल्याने त्याने यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपसायचे आहे.त्याचबरोबर आरोपीला मदत करणारे आणखी काहिजण त्याच्यासोबत आहेत का हे तपासायचे आहे.सखोल तपासासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे.सरकारी वकिलांनीही याआधी गुन्ह्याची आणि आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती दिली.आतापर्यंत या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे तसेच आणखी काही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.आरोपी वकील युक्तिवादआरोपीच्या वकिलांकडून 2 दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी चेहरा tv वर दाखवला गेला पोलिसांनी सोशल मीडिया ट्रायल केलं एवढा गंभीर गुन्हा नाही मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली कुठलाही अत्याचार झाला नाही दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले. 
 


Nanded Umri Tehsildar Suspended: Tehsildar got a slap on the wrist while sitting on a chair; What really happened?
Nanded Umri Tehsildar Suspended: तहसीलदाराला खुर्चीवर बसून गाणंं पडलं महागात; नेमकं घडलं काय?

रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायल्याने त्यांना महागात पडले आहे. तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे.

Apeksha Bhandare

nanded umri tehsildar suspended तहसीलदाराला खुर्चीवर बसून गाणंं पडलं महागात नेमकं घडलं काय

नांदेड: रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायल्याने त्यांना महागात पडले आहे. नांदेड जिल्ह्यातून हा प्रकार समोर आला आहे. समाज माध्यमावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या अहवालानुसार विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित केलं आहे. या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे. 

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केल्याने राज्यात शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याची ही पहिली घटना समोर आली आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेडमधील उमरी तहसील कार्यालयात प्रशांत थोरात हे तहसीलदार पदावर कार्यरत होते. त्यांची बदली झाल्याने 8 ऑगस्ट रोजी थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभाच्या कार्यक्रमात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायलं. या गाण्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश दिले. यानंतर विभागीय आयुक्तांकडून रेणापुरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन करण्यात आले. उमरी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारीच्या खुर्चीवर बसून गाणे गायल्याने निलंबन केले आहे. 

हेही वाचा: Ahilyanagar Crime : धक्कादायक ! अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह ; पतीला अटक, मेहुणा फरार

नेमकं प्रकरण काय?
नांदेडच्या उमरी येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांची लातूरच्या रेणापुर येथे बदली झाली होती. 29 जुलैला त्यांची बदली झाली आणि 30 जुलैला थोरातांना कार्यमुक्त केले. त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे 8 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमरी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार प्रशांत थोरात यांनी खुर्चीवर बसून गाण गायलं आहे. 'तेरे जैसा यार कहा' हे गाणं प्रशांत थोरात यांनी शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गायले. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाल्याने थोरातांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश दिले. यानंतर विभागीय आयुक्तांकडून रेणापुरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन करण्यात आले.