मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक महिने उलटून गेली तरी अद्यापही या प्रकरणी दोषींना शिक्षा झालेली नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून अनेक आंदोलने करण्यात आली त्यानंतर आता पुन्हा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी उद्या अन्नत्याग आंदोलन केलंय. देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून हे अन्नत्याग आंदोलन मस्साजोगच्या ग्रामस्थांनी पुकारलंय. या आंदोलनाला वारकरी संप्रदायाचा सुद्धा पाठिंबा असणारे. दरम्यान आम्हाला कोणतेही शिष्टमंडळ येऊन भेटलं नाही असं वक्तव्य मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलंय.त्यामुळे आता हे आंदोलन नेमकं कोणतं वळण घेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणारे.
दरम्यान या संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासावर अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केलेत. बालाजी तांदळेंवर प्रश्न उपस्थित करत दमानिया यांनी सवाल उपस्थित केलेत. 'जे आरोपी पकडले गेले ते मुद्दाम पकडून दिले का?' असा सवाल दमाणियांनी उपस्थित केला असून 'प्रकरण लावून धरलं नसतं तर वाल्मिक कराडलाही अटक नसती झाली' त्याचबरोबर पीआय गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करा अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केलीय.
हेही वाचा: Bank of Maharashtra Loan Interest Rate: बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्याजदरांमध्ये कपात
काय आहे दमानिया यांचे ट्विट:
धनंजय मुंडे माझे दैवत, वाल्मिक कराड माझे नेते, असं म्हणणारे बाळाजी तांदळे
तांदळेंना पत्र देऊन, त्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याच जवळच्या मित्रांचा, जे खुनाचे आरोपी आहेत
त्यांनाच घेऊन पोलीस शोध करू शकतात का? जे पकडले गेले, ते मुद्दाम पकडवून, बळी दिले गेले
यात शंका आहे का? म्हणूनच कराड फरार राहू शकला
आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी दाखवले गेलं पोलिसांचा तपास चालू आहे
जर प्रकरण लावून धरलं नसतं तर कराडला देखील अटक झाली नसती
बालाजी तांदळे, जो जमिनीचा बंदोबस्त करतो, प्रत्येक स्थळी उपस्थित असतो
तो आरोपींना शोधेल? याची नुसती चौकशी करून त्याला सोडून दिलं?
याला जर थर्ड डिग्री वापरून चौकशी केली, तर कळेल सगळं कुणाच्या सांगण्यावरून होत होतं
पीआय गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करा
पहिल्या दोन आरोपींची टीप कुणाकडून आली? फडणवीस आता तरी काही बोलणार का अजून त्यांना गरज वाटत नाही?