मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेचा प्रवास पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. हार्बर रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांचा खोळंबा झाला आहे. ज्यामुळे दिवसभर काम करून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर ओवरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक लोकल गाड्या एकाच ठिकाणी थांबल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने दिवसभर काम करून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. या बिघाडाचा फटका नोकरदार वर्गासह दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना बसत आहे. दिवसभर काम करून थकून घरी परतणाऱ्या प्रवाशांना लोकल गाड्या थांबल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता असून, अनेकांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी विलंब होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांच्या दैनंदिन वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करून लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर, पाहा जय महाराष्ट्र न्यूज