मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रवाशांना मेन लाईनच्या तिकीट आणि पास वरून ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तर मागील एक तासांपासून सीएसएमटी स्थानकातून एकूण नऊ जलद लोकल रवाना झाल्या आहेत.
स्लो लोकल एकाही रवाना न झाल्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. जलद मार्गावरून कसारा कल्याण आणि ठाणे ट्रेन रवाना झाला आहेत. मात्र स्लो लाईन बंद असल्या कारणाने प्रवाशांचे प्रचंड हाल पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा- मोठी बातमी! भांडुप रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म बदलताना ट्रेनच्या धडकेत युवकाचा मृत्यू
आज सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत असून रेल्वे सेवेचा बोजवारा उडला आहे. त्याचा परिणाम संध्याकाळीही दिसत असून रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. असं असताना दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या लोकलचा डबा रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून बंद केल्याने मोठा गोंधळ उडाला.
प्रवाशांनी 2 ते 3 मिनिटे विनवणी करूनही कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला नाही. या मुजोरपणाचा निषेध करत संतापलेल्या एका प्रवाशाने बंद दरवाजावर पाणी फेकून तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेमुळे फलाटावर काही काळ तणावाचे वातावरण होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.