सोमवारी दिवसभर खोळंबलेली मध्य रेल्वेची सेवा आज पहाटेपासून सुरळीत झाली आहे. कालच्या बिघाडामुळे लाखो प्रवाशांचे मोठे हाल झाले, असंख्य लोक तासन्तास स्थानकांवर अडकून पडलेले होते. या सर्व गोंधळात एक मोठी दुर्घटना देखील घडली. मात्र कालच्या या गोंधळात तीन जणांनी आपला जीव गमावला आहे.
या संपूर्ण घटनेमुळे संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी मध्य रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे.
लोकल प्रवाशांच्या जीवाशी खेळ का केला जातोय, असा सवाल करत नातेवाईकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.