आयआयटी मुंबईचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणावरून मुंबईतील आझाद मैदान आणि आयआयटी कॅम्पसबाहेर सातत्याने निदर्शने सुरू असून साहिलच्या पालकांनी सुरू केलेल्या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
आज दुपारी आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वारावरही विविध संघटनांनी आंदोलन केले. दरम्यान, गेल्या एक महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यावेळी संतप्त आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे.या विलंबामुळे व्यथित झालेल्या साहिलच्या पालकांनी 28 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन पुकारले होते. या उपोषणासाठी पोलिसांकडून रीतसर परवानगी घेण्यात आली असून, पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतर कारवाईला हवा तसा वेग न आल्यामुळे पुन्हा आंदोलन पुकारण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
18 सप्टेंबरच्या संध्याकाळी आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक 4 मधील खोलीत साहिल वाकोडे मृतावस्थेत आढळला. तो 18 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता परीक्षा देऊन वसतिगृहात परतला होता. त्या रात्री उशिरा त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी कोणतीही नोट सापडलेली नाही. साहिल हा ‘एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग’ विभागात बी.टेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. छळ आणि गैरवर्तणुकीमुळेच साहिलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update