नवरात्रीत गरबा खेळणे आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या 1 तास गरबा खेळल्याने किती कॅलरीज बर्न होतात?

नवरात्रीत गरबा खेळणे केवळ भक्ती नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर; जाणून घ्या फायदे
नवरात्रीत गरबा खेळणे  आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या 1 तास गरबा खेळल्याने किती कॅलरीज बर्न होतात?

नवरात्रोत्सवात देवीच्या जागरापोटी मोठ्या भक्तीभावाने गरबा खेळण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. सध्या शासनाच्या निर्णयानुसार रात्री 12 ते अगदी पहाटे 2-3 वाजेपर्यंत गरबा खेळायला परवानगी मिळते. हा केवळ पारंपारिक उत्सव नसून आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरणारा व्यायाम आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

वैद्यकीयदृष्ट्या दिवसभर दमून आल्यानंतर लगेच जेवून झोपणे हे आरोग्यासाठी चुकीचे मानले जाते. मात्र नवरात्रीत गरबा खेळल्याने झोपण्यापूर्वी शरीराची चांगली हालचाल होते. यामुळे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होते.

गरबा खेळताना शरीराची मोठ्या प्रमाणात हालचाल होते, त्यामुळे हा एक उत्तम प्रकारचा कार्डिओ व्यायाम ठरतो. सततच्या टाळ्या, गोलाकार फिरणे आणि पायांच्या हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील ऊर्जा वाढते.

हेही वाचा – तीच तीच ऑक्सिडाइज्ड रिंग घालणं सोडा! यंदाच्या नवरात्रीत ‘या’ स्टायलिश रिंग्सने गरबा नाईटला द्या रॉयल टच

याशिवाय गरब्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कॅलरीज बर्न होणे. अर्धा ते एक तास गरबा खेळल्याने मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास आणि शरीर सुडौल राहण्यास मोठा फायदा होतो. तणाव कमी होऊन मानसिक आरोग्यही सुधारते. त्यामुळे गरबा हे केवळ एक पारंपारिक नृत्य नसून, तो मनोरंजनासोबतच शरीराला तंदुरुस्त ठेवणारा एक संपूर्ण व्यायाम प्रकार आहे.

तज्ज्ञांच्या मते, गरब्याचा वेग आणि तुमचे वजन यावर कॅलरीज अवलंबून असतात, पण सरासरी आकडा असा आहे:
– हलका गरबा (स्लो स्टेप्स): 300 ते 400 कॅलरीज / तास
– मध्यम ते फास्ट गरबा (नॉन-स्टॉप): 500 ते 700 कॅलरीज / तास

1 तास गरबा = 1 तास जिममध्ये धावणे किंवा 1.5 तास सायकलिंग इतका फायदा!

गरब्याने काय-काय होते?

1. वजन कमी: पोट, कंबर आणि मांड्यांवरील चरबी वेगाने कमी होते.
2. हृदय निरोगी: हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे.
3. तणावापासून मुक्ती:डान्स आणि म्युझिकमुळे मूड एकदम फ्रेश होतो.

टीप: गरबा खेळण्याआधी हलका आहार घ्या आणि मध्ये मध्ये पाणी पित रहा. उंच टाचांच्या चपला टाळा, म्हणजे गुडघ्याला त्रास होणार नाही.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version