महाराष्ट्र: महायुती सरकारची सर्वात महत्वाची योजना ठरली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचा महायुती सरकारला निवडणुकीत देखील मोठा फायदा झाला. लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र ही रक्कम वाढवून महिलांना दरमहा 2100 रुपये देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होत मात्र अद्यापही लाडक्या बहिणी या वाढीव हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान या राज्याच्या अर्थसंकल्पनांमध्ये लाडक्या बहिणींसाठी काय पाहुयात:
काय म्हणाले अजित पवार?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याच अजित पवारांनी सांगितलंय.
हेही वाचा: Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
अर्ज बाद ?
ज्या भागातून तक्रारी आल्या त्या त्या भागातील लाभार्थींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. शिवाय विधानसभा निवडणुकीनंतर अनेक निकष समोर आल्याने लाडकी बहीण योजनेतील महिलांनी दंडाच्या अथवा कारवाईच्या भीतीनं अर्ज मागे घेतले होते. तर काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. ज्या महिलांचे अर्ज बाद झाले त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत असं आश्वासन मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं होतं.
दरम्यान महायुती सरकारने अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपयांची तरतूद केली नाही. सद्या जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेत महिलांना 1500 रुपये मिळत आहेत. परंतु आजही 2100 रुपयांच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहे.