आजीच्या निधनानंतर दिपेकेंची भावुक पोस्ट; थेट सोनाक्षी सिन्हानं…; पोस्ट पाहून डोळे पाणावले

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात संपाची लाट उसळली आहे. CJP सह इंडिया आघाडीनेही काल राजधानीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले
Abhijit Dipke
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात संपाची लाट उसळली आहे. CJP सह इंडिया आघाडीनेही काल राजधानीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. CJP चे नेते अभिजित दीपके यांनी 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर याच मुद्द्यावरून आंदोलन पुकारले होते.

मात्र आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली. विमानातून उतरताच अभिजित दीपके आणि त्यांचे सहकारी आशुतोष रांका व सौरव दास यांना ताब्यात घेण्यात आले.

त्याच दिवशी नियतीने अभिजित दीपके यांच्यावर दुसरा घाला घातला. त्यांच्या आजी सावित्रीबाई दीपके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. एकीकडे पोलिसांची कोठडी आणि दुसरीकडे आजीच्या जाण्याचे दुःख, अशा दुहेरी संकटात दीपके सापडले.

धक्कादायक बाब म्हणजे, आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाऊ द्यावे, यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे वारंवार विनंती केली, मात्र पोलिसांनी ती मागणी फेटाळून लावली.

आजीच्या शेवटच्या दर्शनालाही मुकावे लागल्याने व्यथित झालेल्या अभिजित यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आजीची माफी मागितली आहे. आजीचा फोटो शेअर करत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना वाचून कुणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा – दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पुन्हा अटक, नेमकं काय घडलं?

या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कंमेंट्सचा वर्षाव होत असून, बॉलिवूड सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने कमेंट करत लिहिले, “अभिजित, तुमच्यावर ओढवलेले दुःख खूप मोठे आहे, मी मनापासून शोक व्यक्त करते. मला खात्री आहे, त्यांना तुमचा नक्कीच अभिमान वाटत असेल आणि त्या तुमच्या पाठीशी असतील…”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version