‘निखिल खडसेंनी काय पाहिलं होतं?’ चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ! खडसेंचं थेट आव्हान म्हणाले; राजकारण तापलं

एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात निखिल खडसे यांच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘निखिल खडसेंनी काय पाहिलं होतं?’ चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ! खडसेंचं थेट आव्हान म्हणाले; राजकारण तापलं
Eknath Khadse

मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी नगराध्यक्ष आहे, एकही दिवस नगरपंचायतीला दिसत नाही असा आरोप खडसेंनी केला होता. एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेनंतर आमदार पाटील चांगलेच भडकले असून त्यांनी निखिल खडसेंच्या मृत्यूवर बोट ठेवत खडसेंना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

त्यामुळे एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात निखिल खडसे यांच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निखिल खडसे यांच्याबाबत एका जबाबदार मंत्र्याने केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा- महायुतीत अंतर्गत वाद? महायुतीच्या बैठकीत विसंवाद; स्थानिक भाजप आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीला दांडी

निखिल यांच्या मृत्यूच्या वेळी आपण बाहेरगावी होतो, असे सांगत चंद्रकांत पाटील यांना शंका असेल तर त्यांनी सत्ताधारी असल्याने सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी करावी, असे आव्हान खडसे यांनी दिले. ‘मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे; मात्र मला जास्त बोलायला लावू नका,’ असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद आता कोणते वळण घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर, पाहा जय महाराष्ट्र न्यूज

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number