जरांगे पाटलांकडून 500 कोटीचा आरोप, एकनाथ शिंदेंकडून थेट प्रतिआव्हान; म्हणाले, “पुरावे दाखवा”

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांचा गंभीर आरोप केला. त्यानंतर जरांगे पाटलांच्या आरोपांवर पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका मांडली आहे.

जरांगे पाटलांकडून 500 कोटीचा आरोप, एकनाथ शिंदेंकडून थेट प्रतिआव्हान; म्हणाले, “पुरावे दाखवा”
Eknath Shinde On Manoj Jarange Patil

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड मधील नारायणगडावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर  500 कोटी रुपयांचा गंभीर आरोप केला. या खळबळजनक दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपाला सांगितलं की आम्ही जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये दिले, अशी भाजपमध्ये चर्चा आहे, असा मोठा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी त्यांच्या नारायणगड येथील दसरा मेळाव्यात बोलताना केला होता.

त्यानंतर त्यांच्यावर शिवसेना नेत्यांकडून सडकून टीका करण्यात आली. जरांगेच्या या वक्तव्यावरून सध्या आरोपांच्या फैरी होताना दिसत आहेत. त्यानंतर आता, जरांगे पाटलांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचं निमंत्रण राष्ट्रपतींना देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत होते. त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा- ‘देशाला काही काळ पंतप्रधानच नसेल’; राज ठाकरेंची पुढील 5 महिन्यांबाबत मोठी भविष्यवाणी; नेमकं काय म्हणाले?

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “कोणाला 500 कोटी दिले ही नाही आणि कोणाकडून 500 कोटी घेतले ही नाही. त्यामुळे ज्या काशाच्याही आधारावर मनोज जरांगे पाटील हे सगळं बोलत आहेत. त्यांनी यासर्व गोष्टींची बोलण्यापूर्वी शहानिशा करायला हवी होती. त्यांनी केलेल्या आरोपांवर त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते ही त्यांनी दिले पाहिजेत. त्यानंतर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ‘दुध का दुध पाणी का पाणी’ झालं पाहिजे. एवढचं मी या प्रसंगी सांगतो. जरांगे पाटील मराठा समाजाचं काम करत होते, तेव्हा मी मराठा समाजाला विविध कामांतून न्याय देण्याचं काम केलं. गेल्या 60 वर्षांत जे काम झालं नाही, ते आम्ही केलं. आजही मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे. मराठा समाजाचंच काम मनोज जरांगे काम करत होते, त्यामुळे आम्ही त्यांना मदत दिली. त्यांनी राजकीय प्लटॅफॉर्म बनवू नये.”

त्यानंतर, पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी, आता आपण पुरावे देणार असल्याचे म्हटले. मी गुरुवारी सकाळी 11 वाजता पुराव्यासहित सांगणार आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलीय. ते जालन्यातील महाकाळा येथे पत्रकारांशी बोलत होते. पुढे एकनाथ शिंदेंनी मला पैसे दिले की नाही एवढंच सांगावं असं जरांगे म्हणालेत. तसेच मी मराठ्यांना गुरुवारी पुरावे देणार, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. लाचार कोण आहे हे गुरुवारी कळेल, असं म्हणत गरीब आज पण वेदना भोगत असल्याचं जरांगे म्हणालेत. तुम्ही आम्हाला काय उध्वस्त करणार? असा सवाल करत आम्ही पहिलेच उध्वस्त झालोय, अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number