यंदा आनंदाचा शिधा नाही? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिंदेसेनेचा मोठा निर्णय; 10 हजार…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा राज्य सरकारच्या वतीने यंदाच्या वर्षी दिला जाणार नसल्याची माहिती समोर आली होती.

यंदा आनंदाचा शिधा नाही? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिंदेसेनेचा मोठा निर्णय; 10 हजार…
Eknath Shinde

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिवाळीत दिला जाणारा आनंदाचा शिधा राज्य सरकारच्या वतीने यंदाच्या वर्षी दिला जाणार नसल्याची माहिती समोर आली होती. राज्यात दुष्काळाच्या झळा पडत असताना आर्थिक अडचणींमुळे राज्य सरकारने आर्थिक चणचणीमुळे आनंदाचा शिधावाटप न करण्याचे ठरविले आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता राज्याच्या दुष्काळग्रस्त भागात जाऊन गावा गावात हा आनंदाचा शिधा वाटणार आहे. या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांची शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. आज नाशिकच्या हरसुल परिसरामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे नाशिकमधील उपमहापौर विलास शिंदे यांनी दहा हजार आनंदाचा शिधाचे किट तयार करत वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

हेही वाचा- ‘मी खरंच वाट बघतोय…महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय…’; राज ठाकरेंचं मोठं विधान

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “दिवाळी काळी न होता गोड व्हावी म्हणून आपण आनंदाचा शिधा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मागच्या वेळी पण अतिवृष्टी झाली होती, सरकार तेव्हव्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी होते आणि आताही आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला, 5 हजार मदत पण जाहीर केली. समोर दिवाळी आली आहे, आमच्या शिवसेनेच्या विलास शिंदेंनी 10 हजार किट तयार केले. जिथे संकट आहे तिथे शिवसेना.”

“बाळासाहेब असतील किंवा दिघे साहेबांनी तेच सांगितले होते संकटात धावून जा. दसरा मेळाव्यात पण मी सांगितले होते की शेतकऱ्यांच्या बांधावर धावून जा. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला तुमचे दुःख माहिती आहे. सरकार माघार घेणार नाही, केंद्र सरकारही मदत करेल आणि शिवसेनाही मागे राहणार नाही. महापूर असू द्या की दुष्काळ शिवसेना धावून जाते. एकनाथ शिंदे शाखाप्रमुख पासून मुख्यमंत्री झाला.. केंद्र सरकारने मोदीजीनी 6 हजार दिले होते आणि त्यात आपण 6 टाकले होते. कोणीही माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.”

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number