‘काँग्रेसने किती जागा जिंकल्या असतील?’, विधान परिषद निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांना डिवचलं; पोस्ट शेअर

निवडणुकीच्या या निकालांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.

‘काँग्रेसने किती जागा जिंकल्या असतील?’, विधान परिषद निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांना डिवचलं; पोस्ट शेअर
PM Narendra Modi

देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद (MLC) निवडणुकीचे निकाल आणि कल जाहीर झाले असून, या निकालांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील एकूण 28 एमएलसी जागांसाठी झालेल्या या निवडणुकांकडे आगामी विधानसभा निवडणुकांची ‘सेमी-फायनल’ म्हणून पाहिले जात होते. या निवडणुकांचे निकाल अतिशय रंजक ठरले असून, अनेक राज्यांमध्ये भाजपप्रणित युतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. याउलट, राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षाचा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली असून, त्यांना 28 पैकी एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. विशेष म्हणजे, या सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी पारंपारिक ‘बॅलेट पेपर’द्वारे घेण्यात आल्या होत्या.

पंतप्रधान मोदींचा उपरोधिक सवाल

निवडणुकीच्या या निकालांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएम (EVM) मशीनवर फोडत असतो आणि सातत्याने बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करत असतो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) हँडलवरून ट्विट करत काँग्रेस पक्षाला खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार प्रमुख राज्यांत 28 जागांसाठी एमएलसी निवडणुका झाल्या. विशेष म्हणजे या सर्व निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्यात आल्या होत्या. मग सांगा पाहू, यात काँग्रेसने नेमक्या किती जागा जिंकल्या?” पंतप्रधानांच्या या उपरोधिक टीकेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

चारही राज्यांमधील निकालांचे चित्र स्पष्ट; कुठे कोणाचे वर्चस्व?

या निवडणुकीत विविध राज्यांमध्ये वेगवेगळे राजकीय समीकरण पाहायला मिळाले.

  • उत्तर प्रदेश: येथील 11 पैकी जाहीर झालेल्या 6 जागांपैकी भाजपने 4 जागांवर विजय मिळवला, तर समाजवादी पक्षाने (SP) 2 जागा आपल्या नावावर केल्या.
  • बिहार: शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांचे निकाल आले असून, यामध्ये आरजेडी (RJD), ‘जन सुराज’ आणि भाजपने प्रत्येकी 1 जागा जिंकली, तर 1 जागा अपक्ष उमेदवाराने पटकावली.
  • महाराष्ट्र: विधान परिषदेच्या 5 जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीने 2 जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीला 1 जागा मिळवण्यात यश आले.

हेही वाचा –आधी एपस्टिनसोबत फोटो व्हायरल, आता राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी; ‘या’ केंद्रीय मंत्र्याला भाजपकडून संधी

कर्नाटक: कर्नाटकमधील 4 जागांवर एनडीएने (NDA) पूर्णपणे बाजी मारली. विशेषतः बंगळुरू शिक्षक मतदारसंघात जेडी(एस)चे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि 5 वेळा विजयी झालेले विद्यमान सदस्य पुट्टण्णा यांचा 908 मतांनी पराभव केला. कर्नाटकच्या या निवडणुका पूर्णपणे बॅलेट पेपरवर झाल्याने राज्य सरकारमधील काँग्रेस पक्षासाठी हा एक अत्यंत मोठा आणि नामुष्कीजनक धक्का मानला जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number