नागपूर : राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुतीचे दोन तर मविआचे तीन उमेदवार निवडून आले. यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मात्र चुरशीची झाली. सुरूवातीला भाजपच्या उमेदवाराचं पारडं जड असताना अचानक गेम फिरला आणि काँग्रेसचे उमेदवार विजय ठरले. यामागे अपक्ष उमेदवार नितेश वंजारे यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. नागपूरमध्ये अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला असला, तरी या निवडणुकीत कराळे मास्तरांच्या भूमिकेची राज्यभर चर्चा झाली. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या कराळे मास्तरांनी मिळवलेल्या मतांमुळे त्यांच्याकडे किंगमेकर म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, कराळे यांनी आपली आगामी राजकीय वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली असून, २०२९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. तसेच निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्याला कमी लेखले. मागील वर्षी साडेसहा ते सात हजार मते मिळाल्यामुळे यंदा चार हजारांच्या आसपासच मतदान होईल, असा त्यांचा अंदाज असावा. मात्र, ज्या ठिकाणी राजकीय पक्षांचे सदस्य पोहोचले नाहीत, तिथे आपण पोहोचलो, असे कराळे मास्तरांनी सांगितले.
हेही वाचा : मोठी बातमी! पूर्णेकर मृत्यूप्रकरणात मीनाक्षी शिंदे यांचा अखेर राजीनामा
नितेश कराळेंची प्रतिक्रिया देताना सांगितले की, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग, विविध शासन निर्णय मागे घेण्यासाठी केलेली आंदोलने आणि नेत्यांच्या वाहनांसमोर उभे राहून विरोध करण्याची भूमिका यामुळे मोठा वर्ग आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले. लोकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे दोन्ही राष्ट्रीय पक्षांना दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये मोठा फटका बसल्याचा दावाही त्यांनी केला. अभिजीत वंजारी यांना विजयी करण्यासाठी मतदारांना दुसऱ्या पसंतीचे मत महत्त्वाचे असल्याचे आपण सांगितले होते, असेही कराळे मास्तरांनी नमूद केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.