500 कोटींच्या कथित वाटपाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणावरून महायुतीतील नेत्यांसह विरोधी पक्षातील नेतेही आपापल्या भूमिका मांडत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर मंगेश ससाणे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचा- “शिंदेंनी सापाला दूध पाजून ओबीसींचं वाटोळं केलं”, वाघमारेंचा शिंंदेंना खोचक टोला
मनोज जरांगेनी समोर आणलेली ऑडिओ क्लिप मधील 500 कोटींच्या संदर्भात ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी सवाल केला आहे. मनोज जरांगेला 500 कोटी देऊन कोणी उभा केला? भुजबळ साहेबाना शिव्या देण्यासाठी कोणी पैसे दिले..???
पवारांनी, की शिंदेंनी? भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी नेत्यांना कोणी टार्गेट करायला सांगितलं? असे अनेक सवाल मंगेश ससाणे यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील मंगेश ससाणे यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.