पुणे : दोन वेळा मेडिकल कौन्सिलने नाकारल्यानंतर आता पुण्यातील MBBS च्या 50 जागांना मान्यता मिळाली आहे. पुण्याची मागणी पूर्ण झाली असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. आज पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीची तयारी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी बैठक पार पडली. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे भाजप-महायुतीचे उमेदवार मैदानात आहेत. भय्या माने आणि लाड यांनीही विनंतीला मान देत या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच भाजपचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचतील. पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, अमरावतीत शिवसेनेला महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा राहील. ऊस गाळप हंगाम आणि FRP बाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन हे वर्ष अडचणीचं असून ऊस कमी असल्याने गाळपाचा हंगाम लहान होण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी लवकरात लवकर गाळप सुरू करावं. शेतकऱ्यांना FRP चांगली दिली जात आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. कारखाने 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास सांगितलं आहे.
मेडिकल कॉलेजबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, MPSC परीक्षा पारदर्शकतेसाठी सरकार कटिबद्ध MPSC मध्ये पारदर्शक कारभार व्हावा, यासाठी चौकशी समिती आणि व्ही. राधा समिती नेमली आहे. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी आणि दरवर्षी जास्तीत जास्त पदांची भरती व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक पाठिंबा राहील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 5 हजार रुपयांची आगाऊ मदत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लवकर शासन निर्णय काढून 12 उपाययोजना सुरू केल्या. दुष्काळाचा लाभ 365 तालुक्यांपर्यंत पोहोचवला. यापूर्वी शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये दिले जात होते. मात्र सरकारने पाच हजार रुपयांची आगाऊ मदत दिली. शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे मदतीपासून वंचित ठेवायचं नाही, ही सरकारची भूमिका आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.