शिवसेनेच्या आमदाराचा सरकारलाच घरचा आहेर; ‘चेष्टा चालू आहे का?’, म्हणत सुनावले खडेबोर

बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्याच सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आगाऊ मदतीवरून तीव्र शब्दांत टीका केली.
sanjay gaikwad
sanjay gaikwad

बुलढाणा : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने दिवाळीपूर्वी अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये जाहीर केले आहेत. मात्र ही मदत अपूर्ण असून राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. सध्या हे आंदोलन एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. सरकारने पाच हजार रुपयाची मदत जाहीर केली, ती शेतकऱ्यांची चेष्टा आहे, असे विधान सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अपुरी म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होऊन शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

हेही वाचा :सतेज पाटलांनी मैदान मारलं, दिग्गजांना चितपट केलं; गोकुळ दूध संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version