SIR विरोधात सोलापुरात युवा महासंघाचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

दिल्ली पाठोपाठ राज्यातही CJP च्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. सोलापूर SIR प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात युवा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन छेडले
SIR विरोधात सोलापुरात युवा महासंघाचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

दिल्ली पाठोपाठ राज्यातही CJP च्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. सोलापूर SIR प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात युवा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी केले.

यावेळी 13 कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा गंभीर आरोप युवा महासंघाने केला आहे. वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

हेही वाचा – ‘देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कट रचला जातोय…’; CJP च्या आंदोलनावरून कंगना रणौतचा गंभीर आरोप

युवा महासंघाच्या प्रमुख मागण्या –

1. वगळलेली पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत.
2. मतदार यादी पुनरावलोकनासाठी किमान 2 महिन्यांची मुदत द्यावी.
3. SIR प्रक्रिया पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने राबवावी.
4. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे.
5. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत सरन्यायाधीशांचा समावेश करावा.

या मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा महासंघाने दिला आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली असून, पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version