राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीची सुमारे दोन तास विविध मुद्द्यांवरमहत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर आज अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गेले आहे.
तेच अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावं यासाठी मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार धनंजय मुंडे आणि जय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. याचदरम्यान राष्ट्रवादीकडून 5 मंत्री बदलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासर्व घडामोडींवर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत महत्त्वाची माहिती दिली आहे.
हेही वाचा- महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ! दादांच्या राष्ट्रवादीतील 5 मंत्री बदलणार?
छगन भुजबळ म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी गेलो. अर्थखात जे आमचे आहे ते त्यांनी लवकरात लवकर आम्हाला दिले पाहिजे. सकारात्मक चर्चा झाली. सध्या धुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे त्यासंदर्भात सध्या लक्ष जास्तच आहे. त्यांची अडखाती नाही दुसरा कोणताही अजेंडा नाही किंवा मंत्री बदलणार असे काहीही नाही. आमची मागणी करणे भूमिका आहे.”
“मुख्यमंत्री म्हणाले आपल्याला द्यायचे असं म्हणाले आहे. आम्हला अर्थ खातच पाहिजे आहे. आपल्या शेतकऱ्यांना तयार करायचे आहे. मोठी रक्कम तयार करायची आहे. यापूर्वी देखील काँग्रेस मध्ये होते तेव्हा देखील नवीन जगा आली की असे बदल होते. मंत्रिमंडळ विस्तार किंवा बदल हा केव्हा होईल हे फक्त मुख्यमंत्री यांना माहिती आहे. त्या गप्पा आहे 12 वर्षाच्या त्या गप्पा आहेत, कोणी दिले नाहीत कोणी घेतले नाहीत. विलिनिकरण्याच्या मुद्दा हा कायम साठी बंद आहे या चर्चा तुम्हीच करता.”