मुंबई: आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या गुरूंचे आभार मानतात, तसेच त्यांची पूजा करतात. त्यासोबतच, शाळेत, महाविद्यालयात विद्यार्थी आपल्या गुरूंना पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू देतात. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे एक विशेष महत्त्व आहे. मात्र अनेकांना हा प्रश्न पडतो की, गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?
गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे या दिवशी महाभारताची रचना करणारे महर्षी वेद व्यास यांची जयंती असते. मात्र, गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त वेद व्यासांची जयंती एवढंच नसून त्याबरोबर आणखी एक आख्यायिक आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्तऋषींना म्हणजेच सात ऋषींना भगवान शंकरांनी योगाचे ज्ञान दिले होते. त्यामुळे, हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो. त्यासोबतच, गुरुप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमेची तारीख आणि तिथी
वैदिक पंचांगानुसार, यावर्षी आषाढी महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात 10 जुलै रोजी पहाटे 1 वाजून 36 मिनिटांनी सुरू होईल आणि 11 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 06 मिनिटांनी समाप्त होईल.
(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)