नवी दिल्ली, ०४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला केकेआरने लाजीरवाणा पराभव केला. पण या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला मोठा धक्का बसला आहे. ऋषभकडून एक मोठी चूक घडली असून त्याने आपली ही चूक मान्यही केली आहे. या चुकीनंतर बीसीसीआयने त्याच्यावर कडक कारवाई केल्याचे आता समोर आले आहे.
दिल्लीच्या संघाला बुधवारी पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. मैदानात दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई होत असताना दुसरीकडे पंतला क्षेत्ररक्षण लावताना अधिक वेळही लागत होता. त्यामुळे गोलंदाजीला जास्त वेळ लागत होता. या सर्व गोष्टी घडत असताना दिल्लीच्या संघाला निर्धारीत वेळेत २० षटके पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे सामना संपल्यावर दिल्लीच्या संघाची चूक त्यांना दाखवण्यात आली. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला संघाची ही चूक दाखवली गेली. त्यानंतर पंतने आपली ही चूक मान्य केली. त्यानंतर ऋषभ पंतवर २४ लाखांचा दंड लावण्याची कारवाई बीसीसीआच्या नियमानुसार करण्यात आली. त्याचबरोबर संपूर्ण संघातील खेळाडूंच्या मानधनातून २५ टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्यात येणार आहे. दिल्लीच्या संघाकडून ही गोष्ट दुसऱ्यांदा घडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या संघाने अजून एकदा ही चूक केली तर त्यांना मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंत यांना अशी चूक पुन्हा करून नक्कीच चालणार नाही.