Thursday, July 18, 2024 11:14:18 PM

सूर्या मुंबईमध्ये कधी दाखल होणार ?

सूर्या मुंबईमध्ये कधी दाखल होणार

मुंबई, ०४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे बुधवारी सर्वांसमोर आले खरे, पण तो अजूनही बंगळुरु येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे आहे. पण सूर्या मुंबई इंडियन्सच्या संघात कधी दाखल होणार, याची माहिती आता समोर आली आहे. पण सूर्या आयपीएलचा सामाना लगेच खेळू शकतो का?, याबाबत मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही..

सूर्या हा दक्षिण आफ्रिेकेच्या दौऱ्यावर असताना जायबंदी झाला होता. त्यानंतर गेले तीन महिने तो क्रिकेटपासून लांब होता. सूर्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर सूर्या हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे रवाना झाला होता. तिथे त्याला फिटनेस कमावण्यासाठी बराच वेळ लागत होता. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी सूर्याची पहिली फिटनेस टेस्ट झाली होती. यावेळी सूर्या या फिटनेस चाचणीत नापास झाला होता. त्यामुळे सूर्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही, हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आयपीएल सुरु झाल्यावर पुन्हा एकदा सूर्याची फिटनेस चाचणी घेण्यात आली होती. या दुसऱ्या फिटनेस टेस्टमध्येही सूर्या नापास ठरला होता. त्यामुळे सूर्या आयपीएल खेळणार की नाही, अशी चर्चा सुरु होती. पण सूर्या आता तिसऱ्या फिटनेस चाचणीत पास झाला आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये खेळू शकतो. पण तो मुंबई इंडियन्सच्या संघात कधी दाखल होणार, हे आता समोर आले आहे.


सम्बन्धित सामग्री