पगार- पेन्शनवाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पुढच्या आठवड्यात होणार मोठा निर्णय

Central Employees DA Hike News : असंख्य केंद्रीय कर्मचारी आणि निवृतीवेतनधारकांसाठी ऑक्टोबर महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या हालचालींना वेग आलेला असून या महिन्यात यासंबंधित दोन मोठ्या बैठका पार पडणार आहेत.

पगार- पेन्शनवाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पुढच्या आठवड्यात होणार मोठा निर्णय
Central Employees DA Hike News

असंख्य केंद्रीय कर्मचारी आणि निवृतीवेतनधारकांसाठी ऑक्टोबर महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या हालचालींना वेग आलेला असून या महिन्यात यासंबंधित दोन मोठ्या बैठका पार पडणार आहेत.

‘या’ तारखा लक्षात ठेवा
आयोगाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार,22 आणि 23 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटना तसेच युनियन आपल्या मागण्या या थेट आयोगापुढे मांडणार आहे. ज्यामध्ये पगारवाढ, भत्ते, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टर यांसारख्या अनेक मुद्यांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा-एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसची ड्रोनद्वारे रेकी? जळगावात खळबळ; मोठ्या षडयंत्राचा आरोप

मुंबईमधील बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक संघटनांना 10 ऑक्टोबर 2026 पर्यंत अपॉइंटमेंटसाठी अर्ज करणे अनिवार्य असणार आहे. अर्जासोबत मेमोरँडम सादर केल्यानंतर मिळेला ‘ Unique Memo ID’ ही देणे गरजेचे राहिल. मात्र, मुंबईतील बैठकीचे नेमके ठिकाण तसेच वेळ अजूनही जाहीर झालेली नाही. यापूर्वी 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी आयोगाचा बेंगळुरु दौरा होणार असून,त्यासाठी अर्जाची अंतिम राखीही 18 सप्टेंबर होती.

दरम्यान,महागाई भत्याबाबत असंख्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. सध्या पाहिलं तर DA हा 60 टक्के असून, ऑक्टोबरमध्ये 4 टक्क्यांची वाढ होऊन तो 64 टक्के होण्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अजूनही सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number