मुंब्रा हिरवा करण्याचा इशारा देणाऱ्या सहर शेखच्या वडिलांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा

एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांना शिंदेसेनेतून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंब्रा हिरवा करण्याचा इशारा देणाऱ्या सहर शेखच्या वडिलांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा
Yunus Sheikh

एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांना शिंदेसेनेतून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युनूस शेख यांची शिंदे सेनेच्या कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात युनूस शेख यांचा एक फोटोही समोर आला आहे. यामध्ये शिंदे सेनेचे पदाधिकारी युनूस शेख यांना नियुक्तीचे पत्र देताना दिसत आहेत. मात्र त्यांना हे पद मिळताच त्यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. युनूस शेख यांनी आपण शिंदे सेनेत गेल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच हे पद केवळ त्यांच्या व्यवसायाकरिता मिळालेले असून आपण एमआयएम मध्येच असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी युनूस शेख म्हणाले की, “मी कळवा मुंब्रा केबल सेनेत प्रवेश केला आहे कारण ही संघटना दिघे साहेब असतानापासूनची आहे. कळवा मुंब्रा केबल सेना अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी मला जबाबदारी दिली आहे. आमची एम आय एम ची कुठलीही संघटना नाही, केबल आणि इंटरनेट हा माझा गेल्या 40 वर्षांपासून व्यवसाय आहे त्यामुळे कुठल्या ना कुठल्या संघटनेशी मला जुळायचं होतं म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या संघटनेशी जुळलो.मी आधीपासून या संघटनेशी जुळलेलो होतो मात्र आज मला पद देण्यात आलं आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडेल. एकनाथ शिंदे आणि माझ्या वडिलांचे 45 वर्षांपासून संबंध आहेत, त्यांच्याकडून आम्हाला भरपूर सहकार्य मिळत आहे, एकनाथ शिंदे नेहमीच आमच्या मागे उभे आहेत.”

हेही वाचा- एकनाथ शिंदेंचा महायुतीला धक्का?, सलग दुसऱ्यांदा बैठकीला दांडी; नाराजीचे कारण काय?
पक्षप्रवेश न करताच युनूस शेख यांच्यावर शिंदेसेनेकडून मोठी जबाबदारी
शिवसेनेच नियुक्तीपत्र जरी असलं आणि जर मला शिवसेनेच चिन्ह असलेला मला जर गमछा घातला तर याचा अर्थ असा होत नाही की मी पक्षप्रवेश केला आणि जर मला पक्षप्रवेश करायचा असेल तर मला कोणतही बंधन नाही तो मी कधीही करू शकतो. पण आता मी ज्या पक्षात आहे ज्या पक्षामुळे आम्ही संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहोत, एवढ्या चांगल्या जागा आम्ही निवडून आणल्या आहेत. शिवसेनेची संबंध ठेवण्याचं कारण म्हणजे माझे वडील आणि माझे एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत, एकनाथ शिंदे त्यांच्या जुन्या सहकार्यांना आणि त्यांच्या परिवारांना कधीच विसरत नाही, जेव्हा कधीही आमच्यावर संकट येतं तेव्हा ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत होते आणि आत्ताही राहतात, मी जर त्यांना सांगितलं तर याहून मोठं पद घेऊ शकतो, पण असं काही नाही.

संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखनंतर आता वडिलांच वक्तव्य चर्चेत 
मी एमआयएम मध्येच आहे आणि त्यातच राहून जनतेची काम करणार, शिवसेनेकडून जे पद मिळाला आहे ते माझ्या व्यवसायाशी निगडित आहे. आमच्या पक्षाचं काम करण्यासाठी आम्हाला सेनेकडून फंड आणावा लागेल किंवा भाजपकडून फंड आणावा लागेल तर आम्ही जाऊ कारण आम्हाला जनतेची काम करायची आहेत. हिरवा करणार ही गोष्ट आम्ही त्यावेळेस क्लिअर केली होती, हिरवा कलर मुस्लिमांचा भगवा कलर हिंदूंचा असं काही नाही हे माझ्या मुलीने स्पष्ट सांगितलं होतं, हिरवं म्हणजे हिरवी झाडं निसर्ग सर्व हिरवा आहे, हिरवं तर आम्ही करणारच त्याच्या मध्ये आम्ही मागेपुढे करणार नाही, एक पाऊलही मागे हटणार नाही, येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला हिरवा करूनच दाखवू एकनाथ शिंदे आमच्या मागे आहेत, ते सर्वांचे बॉस आहेत तर आमचेही बॉस आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number