दुबई, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : कारकिर्दीतील शतकी कसोटीत नऊ विकेट टिपणाऱ्या रविचंद्रन अश्विनला आयसीसी कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे. गोलंदाजांच्या या यादीत त्याने जसप्रीत बुमराहला बुधवारी(१३ मार्च) मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार रोहित शर्माही कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहांत (सहा) परतला आहे. धरमशाला कसोटीत शतक ठोकणाऱ्या रोहितला पाच क्रमांकाचा फायदा झाला असून त्याने सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.