Sunday, May 19, 2024 01:16:45 AM

कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे

कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे

नवी दिल्ली, ५ मे २०२४, प्रतिनिधी : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाल कांद्याची ५५० डॉलर प्रतिटन आणि त्यावर ४० टक्के निर्यात शुल्क असे एकूण किमान ७७० डॉलर प्रतिटन दराने म्हणजे प्रतिकिलो ६४ रुपये दराने निर्यात करता येणार आहे. निर्यातबंदी हटताच शनिवारी कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल सरासरी ५०० रुपयांची वाढ झाली.

केंद्राच्या पथकाने लासलगाव बाजारात एप्रिलपासून स्थिर असलेले कांद्याचे दर, अहमदनगर, नाशिक, सोलापूरला जाऊन रब्बीच्या हंगामातील कांद्याच्या पिकाची केलेली पाहणी तसेच व्यापारी, शेतकरी, चाळी, केंद्रीय भांडार आणि गोदामांमधील साठ्यांची माहिती घेतली. चौथ्या महिन्यापासून ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत होणाऱ्या कांद्याच्या हानीची जोखीम लक्षात घेऊन मुबलक उपलब्धतेच्या आधारे कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हटविण्याचा निर्णय घेतला. 


सम्बन्धित सामग्री