Sunday, August 17, 2025 01:43:13 PM

उद्यापासून बारावीची परीक्षा; पाहा काय आहे नियोजन

उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होतेय. यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये थोड्याफार प्रमाणात चिंतेचे वातावरण दिसून येतंय.

उद्यापासून बारावीची परीक्षा पाहा काय आहे नियोजन

महाराष्ट्र: उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होतेय. यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये थोड्याफार प्रमाणात चिंतेचे वातावरण दिसून येतंय. यंदा  राज्यात एकूण 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 3 हजार 373 मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. विज्ञान शाखेला सात लाख 68  हजार 937 विद्यार्थी आहेत. तीन लाख 80 हजार 410  विद्यार्थी वाणिज्य शाखेला तीन लाख 19 हजार 439 विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम 31 हजार 735 विद्यार्थी टेक्निकल सायन्स 4 हजार 486 असे एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

हेही वाचा: शिरीष महाराजांची शेवटची इच्छा पूर्ण; कर्ज फिटले

11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. बारावीच्या या परीक्षेत यंदा एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 10  हजार 348 मुले तर 6 लाख 94 हजार 652 मुली आहेत.  दरम्यान कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके देखील सतर्क असल्याचं समोर आहे. 

बारावीच्या परीक्षेदरम्यान भरारी पथकाचे महत्त्वाचे काम परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राखणे हे असते. परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे पथक कार्यरत असते.

हेही वाचा: इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरोधात तक्रार

भरारी पथकाची मुख्य जबाबदारी:

परीक्षा केंद्रांची अचानक तपासणी: भरारी पथक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय परीक्षा केंद्रांवर पोहोचते आणि परीक्षेची स्थिती तपासते.
कॉपी रोखणे: विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन तर केले नाही याची खातरजमा करणे.
प्रश्नपत्रिकेची सुरक्षा: प्रश्नपत्रिका योग्य वेळी आणि नियमानुसार वितरित केली जाते का, याची पडताळणी करणे.
उत्तरपत्रिका व्यवस्थापन: परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षीतपणे जमा होतात का, यावर लक्ष ठेवणे.
प्रशासनाला अहवाल देणे: गैरप्रकार आढळल्यास संबंधित शिक्षण मंडळ आणि प्रशासनाला अहवाल सादर करणे.
शिस्त राखणे: परीक्षा केंद्रांमध्ये शिस्त राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिक परीक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी लक्ष ठेवणे.
भरारी पथक हे शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार कार्यरत असते आणि परीक्षेचा निष्पक्ष व पारदर्शक निकाल लागावा यासाठी प्रयत्न करते.


ganeshostav 2025 chinchpoklicha chintamani first look
Chinchpoklicha Chintamani First Look : 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर

गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे.

Ishwari Kuge

chinchpoklicha chintamani first look  चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीची पहिली झलक समोर

मुंबई: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला जातो. यादरम्यान, गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणून त्यांची विधीवत आणि मनोभावे पूजा करतात. अशातच, गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे. त्यामुळे, गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. 

'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक

मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक म्हणून 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची ओळख आहे. रविवारी सकाळी 'चिंचपोकळीचा चिंतामणी' या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर बाप्पाची पहिली झलक समोर आली आहे. हा पोस्ट पाहताच, गणेश भक्तांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली, 'डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आला', तर दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली की, 'चिंतामणी आले माझे'. 

परेल लोकल वर्कशॉपसमोर गणेश भक्तांची गर्दी

रविवारी, 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीचा आगमन सोहळा असल्याने मुंबईतील करी रोडजवळ असलेल्या परेल लोकल वर्कशॉपसमोर लहानापांसून ते मोठ्यांपर्यंत गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यादरम्यान, गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला आहे.