मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर चालून हल्ला करण्यात आला. दिनांक 16 जानेवारी रोजी बॉलिवूड सेलिब्रिटी सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झालेला होता , त्यानंतर त्याच्यावर तात्काळ लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. अशातच आता डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यातच आता या प्रकरणी मोठी माहिती समोर येतेय. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी आता एका महिलेला अटक करण्यात आलीय.
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईत यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला अटक केल्याची माहिती मिळत आहे.
या महिलेचं नाव खुखुमोनी जहांगीर शेर असल्याचं बोललं जात असून या महिलेला पोलिसांकडून बंगालमध्ये अटक क्लरण्यात आलीय. यासंदर्भात अद्यापपर्यंत पोलिसांकडून जरी काही सांगितल्या गेलं नसलं तरी नेमकं या महिलेचा संबंध काय असा प्रश्न सर्वानाच पडला असून पोलीस आता यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणारे.