Sunday, April 20, 2025 05:08:20 AM

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर; निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंचा खळबळजनक दावा

बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर दिली होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला.

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेंचा खळबळजनक दावा

बीड : बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर दिली होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला. बोगस एनकाउंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिली जाते असं देखील रणजीत कासले यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

सध्या बीडमधील सोशल माध्यमांवर रणजीत कासले यांचा हा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल मीडियातून केले आहेत. आता वाल्मिक कराड याच्या एनकाउंटर बद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा : यवतमाळचा शेतकरी मालामाल; झाडाने बनवलं करोडपती

'अधिकारी असताना कारवाई का नाही केली?' 
रणजीत कासले या अधिकाऱ्याबद्दल खरच आपण  बातमी करू नये असं मला वाटतं. अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे. त्याचे आधीचे व्हिडीओ अतिशय मद्यधुंद अवस्थेतील पाहिले आहेत असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. तुम्हाला एवढं शहाणपण होत. मग तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली असा सवालही दमानिया यांनी केला आहे. आता हा माणूस सायबरमध्ये आहे. सायबरच्या अधिकाऱ्याला कोणीच एन्काऊंटर करायला सांगत नाही. कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे हाच त्याचा कार्यक्रम आहे असं म्हणत दमानिया आक्रमक झाल्या आहेत. 


सम्बन्धित सामग्री