Thursday, December 05, 2024 05:50:31 AM

police car stolen
पोलिसांनाच सुरक्षिततेची गरज

पुणे शहरातील धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालया बाहेरून पोलिसांच्याच गाड्या चोरीला गेल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनाच सुरक्षिततेची गरज 
crime

पुणे, १६ मे, २०२४, प्रतिनिधी : पुणे शहरातील धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालया बाहेरून पोलिसांच्याच गाड्या चोरीला गेल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तीन गाड्या चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच सुरक्षिततेची गरज आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पार्क केलेल्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यापैकी  एक दुचाकी पुण्यात आढळूनआली आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसात ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अवघ्या अडीच महिन्याच्या काळात चोरट्यांनी तब्बल ४०० वाहने चोरी केली आहेत. त्यांची किंमत जवळपास १ कोटी ५१ लाख ८४ हजार रुपये आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo