Saturday, February 15, 2025 06:33:29 AM

Nitesh Rane
नितेश राणेंचा अचलपुरात आक्रोश मोर्चा

नितेश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने रयत संघटना, मुस्लिम संघटना व पुरोगामी संघटनांनी सभेला परवानगी न देण्याची मागणी केली होती.

नितेश राणेंचा अचलपुरात आक्रोश मोर्चा 

अमरावती : भाजपा नेते नितेश राणे यांचा अचलपूर येथे आज होणाऱ्या आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेला सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र आता पुन्हा परवानगी देण्यात आलेली आहे. राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने रयत संघटना, मुस्लिम संघटना व पुरोगामी संघटनांनी सभेला परवानगी न देण्याची मागणी केली होती.

यामुळे अचलपूरमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अमरावती जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. नितेश राणे दुपारी मुंबईवरून विमानाने नागपूर आणि नंतर अचलपुरात पोहोचणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी भाजप व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उत्सुक आहेत.

पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अचलपूर शहराला पोलीस ठाण्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. यासाठी 134 पोलीस अधिकारी, 1200 पोलिस कर्मचारी, तसेच 100 हून अधिक वाहनांसह गस्त घालणारे क्यूआरटी, आरसीपी आणि एसआरपीच्या कंपन्या तैनात करण्यात आले आहेत. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून पोलिस कुमक बोलवण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री