चेतन किर्दत, प्रतिनिधी मुंबई : 22 जानेवारीला रात्री गोरेगाव परिसरात एक 20 वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. तिच्या गुप्तांगात सर्जिकल ब्लेड आणि दगड सापडल्याने घटना अधिक गंभीर ठरली आहे. तरुणीला पाहताच स्थानिक नागरिकांनी वनराई पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच वनराई पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेची माहिती घेत पोलिसांनी त्वरित पीडित तरुणीला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या पीडित तरुणीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून वनराई पोलिसांनी मुलीच्या जबाबानंतर अज्ञात रिक्षाचालकाविरोधात 64 (2) (एम) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, 21 जानेवारीला रात्री वसई स्टेशन परिसरात तिला एक अनोळखी रिक्षाचालक भेटला. कौटुंबिक तणाव आणि आत्महत्येच्या विचारांबाबत महिलेने त्याच्याशी संवाद साधला. रिक्षाचालकाने तिचे सांत्वन करण्याचा बहाणा करत तिला वसई जवळील सागरी बीचवर घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने संभोग केला. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने पीडित तरुणीला गोरेगाव पूर्वेतील राम मंदिर स्टेशनजवळ फेकून गेला.
हेही वाचा : दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला
याप्रकरणी वनराई पोलिसांनी तपास सुरू करत 32 वर्षीय आरोपी रिक्षाचालक राजरतन वायवळ याला वालीव येथील झोपडपट्टीमधून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने तरुणीवर अत्याचार केल्याचे कबूल केलं.
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी रिक्षा चालकाचे लग्न झाले असून त्याला 2 मुली आहेत. सध्या वनराई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणात सखोल चौकशी करत आहेत.