2024 हे वर्ष हॉरर चित्रपटांच्या दृष्टीने खूप खास होते. 2024 ला अभिनेता अजय देवगण आणि आर.माधवन यांचा सस्पेन्स आणि हॉरर चित्रपट शैतान रिलीज झाला होता. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर मुंज्या आणि स्त्री 2 या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. त्यामुळे, लवकरच या चित्रपटांचे पार्ट रिलीज होणार असून, चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आता 2025 मध्येदेखील आपल्याला हॉरर चित्रपटांचा महापूर पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार आणि संजय दत्त यांसारखे दिग्गज कलाकार भूत-प्रेतांसोबत लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशातच, हॉरर चित्रपटांच्या यादीत आता अभिनेत्री काजोलसुद्धा एन्ट्री करणार आहे. हा चित्रपट हॉरर आणि थ्रिलर असून, अजय देवगण या चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचे नाव 'माँ' आहे. नुकताच या चित्रपटाशी संबंधित पहिले पोस्टरदेखील रिलीज करण्यात आले होते. हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे हे सांगण्यात आले होते.
हेही वाचा: Bam Bam Bhole Song Teaser: सलमान खानच्या आगामी चित्रपटातील 'बम बम भोले' सॉंगचा टीझर रिलीज
'माँ' चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज:
तब्बल तीन वर्षांनंतर काजोल 'माँ' चित्रपटातून थिएटरमध्ये दाखल होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. मात्र, आता या चित्रपटाचे पहिले पोस्टरही रिलीज केले आहे. सोमवारी, काजोलने या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटकवर शेयर केले, ज्यामध्ये काजोल एका तीव्र लूकमध्ये दिसत आहे.
'माँ' चित्रपट कधी रिलीज होणार?
काजोलने या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटकवर शेयर केले. ज्यामध्ये, 'नरक येथे आहे... देवीही येथे आहे' असे कॅप्शन काजोलने लिहिले आहे. लवकरच हा चित्रपट 27 जून 2025 रोजी जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. मात्र, 20 जून 2025 रोजी अभिनेता राजकुमार रावचा ॲक्शन थ्रिलर मलिक हा चित्रपट रिलीज होणार आहे, जो काजोलच्या आगामी चित्रपटाला टक्कर देऊ शकतो.
आगामी 'माँ' चित्रपटातील कलाकार:
विशाल फुरियाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'माँ' चित्रपटाची कथा सायविन क्वाद्रस यांनी लिहिली आहे. जिओ स्टुडिओज आणि देवगण फिल्म्स यांच्या बॅनरखाली हा चित्रपट होणार असून, हा चित्रपट अजय देवगण आणि ज्योती देशपांडे निर्मिती करत आहेत.