Saturday, June 15, 2024 04:15:30 PM

कमल हसन यांच्या लेकीचा ब्रेकअप

कमल हसन यांच्या लेकीचा ब्रेकअप

मुंबई, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते कमल हासन हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या कमल हासन यांची मोठी मुलगी श्रुती हासन चर्चेत आहे. श्रुतीने जवळपास चार वर्षे डेट केल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केल्याची माहिती समोर आली आहे. पण त्यांचा ब्रेकअप कोणत्या कारणामुळे झाला याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे.

श्रुतीने बॉयफ्रेंड शंतनू हजारीकाला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. तसेच त्यांनी एकमेकांसोबतचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटो आणि व्हिडीओ डिलिट केल्याचे दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च २०२४मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. एकमेकांसोबत पटत नसल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. शंतनू हा एक डूडल कलाकार आणि चित्रकार आहे.

श्रुतीने ब्रेकअपवर बोलण्याचे टाळले आहे. तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच सध्या मला प्रायवसीची गरज आहे. त्यामुळे माझे आयुष्य खासगी राहुद्या अशी विनंती देखील तिने केली आहे.

४ वर्ष श्रुती राहात होती लिवइनमध्ये

श्रुती आणि शंतनू एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करताना दिसायचे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रुतीने शंतनूचे कौतुक केले होते. 'शंतनूमुळे माझ्या स्वभावत बदल होत आहे. मी एक शांत आणि दयाळू व्यक्ती बनत चालले आहे. मी शंतनूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. कारण तो एक अतिशय विचारशील आणि शांत स्वभावाचा मुलगा आहे. मला त्याच्यामधील हे गुण प्रचंड आवडतात' असे श्रुती म्हणाली होती. करोना काळापासून म्हणजेच २०२० पासून शंतनू आणि श्रुती मुंबईत एकत्र राहात होते. दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले होते.


सम्बन्धित सामग्री