Sunday, February 16, 2025 10:22:03 AM

Famous Mahakumbh Girl work in a movie
महाकुंभातील 'ती' सुंदर तरुणी चित्रपटात काम करणार?

सद्या एक सुंदर तरुणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. या तरुणीच्या डोळ्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावलंय. मोनालिसा असं या तरुणीचं नाव असून ती अवघ्या १६ वर्षांची आहे.

महाकुंभातील ती सुंदर तरुणी चित्रपटात काम करणार

सद्या एक सुंदर तरुणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. या तरुणीच्या डोळ्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावलंय. मोनालिसा असं या तरुणीचं नाव असून ती अवघ्या १६ वर्षांची आहे. प्रयागराज महाकुंभामध्ये ती रुद्राक्ष आणि इतर मणी विकून तिचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिच्या अद्भुत सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली असून आता ती बॉलिवूडमध्ये काम करणार अशी चर्चा आहे. मोनालिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर झाल्यानंतर जोरदार  व्हायरल झाला. सुंदर डोळ्यांची १६ वर्षांची मुलगी मोनालिसा हिला पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी जमू लागली. त्यामुळे आता तिच्या सुंदरतेमुळे ती बॉलिवूडमध्ये काम करणार असल्याची चर्चा आहे. यावर काय म्हणाली मोनालिसा पाहुयात: 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय म्हणाली मोनालिसा: 

मोनालिसाला कोणीतरी विचारलं की जर तिला बॉलिवूडमधून चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली तर काम करायला आवडेल का? यावर मोनालिसाने उत्तर दिलं की, तिला नक्कीच अभिनय करायला आवडेल. मोनालिसा ही मूळची मध्यप्रदेशातील इंदूरची आहे. प्रयागराज महाकुंभमध्ये रुद्राक्ष आणि इतर मणी विकून ती तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मोनालिसाने सांगितले की, तिला ऐश्वर्या राय बच्चन सारखं चित्रपटांमध्ये यशस्वी व्हायचं आहे. व्हायरल झाल्यानंतर, वाढत्या गर्दीच्या दबावामुळे ती महाकुंभ सोडत आहे. आता तिला भीती वाटू लागली आहे कारण तो बाहेर पडताच गर्दीने वेढली जाते. मोनालिसाने सांगितलं होतं की, तिचं सौंदर्य पाहून काही लोकांनी तिला महाकुंभमधून नेण्याची धमकीही दिली होती. दरम्यान आता मोनालिसाने अभिनय करायला आवडेल असे म्हटल्यानंतर खरचं तिला बॉलिवूडच्या ऑफर यातील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
 


सम्बन्धित सामग्री