Saturday, August 16, 2025 07:36:06 AM

OTT Release: मार्च अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार 4 नवीन चित्रपट

नेहमीप्रमाणे, मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अनेक नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. चला तर जाणून घेऊया कोणकोणते वेब सिरीज किंवा चित्रपट पाहायला मिळणार आहेत.

ott release मार्च अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार 4 नवीन चित्रपट

नेहमीप्रमाणे, मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अनेक नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्स जसे की डिस्ने+हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि झी5 वर विविध प्रकारचे अ‍ॅनिमेटेड, सस्पेन्स थ्रिलर कंटेंट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणकोणते वेब सिरीज किंवा चित्रपट पाहायला मिळणार आहेत. 


1. मुफासा - द लायन किंग (Mufasa - The Lion King):

लवकरच बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कामगिरी करणारा हॉलीवूडचा अ‍ॅनिमेटेड चित्रपट मुफासा: द लायन किंग आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 2019 मध्ये क्लासिक द लायन किंगचा प्रीक्वल असलेला हा चित्रपट बुधवारी, 26 मार्च 2025 पासून जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


2. ज्वेल थीफ - द हिस्ट बिगिन्स (Jewel Thief - The Heist Begins):

सैफ अली खान आणि जयदीप अहलावत सारख्या कलाकारांना घेऊन 'ज्वेल थीफ: द हिस्ट बिगिन्स (Jewel Thief: The Heist Begins)' हा चित्रपट शुक्रवारी 28 मार्च 2025 रोजी, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक प्रकारे अ‍ॅक्शन-पॅक्ड आणि त्यासोबतच अ‍ॅडव्हेंचर थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे निर्माते सिद्धार्थ आनंद आहेत तर चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल आणि कुकी गुलाटी यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि जयदीप अहलावत एक विनम्र चोर आणि एका शक्तिशाली गुन्हेगाराच्या मुख्य भूमिकेत आहेत. दोघे मिळून 500 कोटी किमतीचा आफ्रिकन रेड सन हिरा चोरण्यासाठी एकमेकांना सहकार्य करतात. 


3. विदुथलाई - भाग 2 (Viduthalai Part - 2):

2023 मधील तामिळ भाषेत प्रदर्शित झालेला राजकीय गुन्हेगारी थ्रिलर चित्रपट 'विदुथलाई' च्या सिक्वेलची प्रतीक्षा संपली आहे. शुक्रवारी, 28 मार्च 2025 रोजी 'विदुथलाई - भाग 2 (Viduthalai Part 2)' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दक्षिनात्य अभिनेता विजय सेतुपती, सूरी, गौतम वासुदेव मेनन, भवानी श्री, सर्वाना सुब्बिया, बालाजी शक्तीवेल यासारखे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि सह-निर्मिती वेत्रिमारन यांनी केली आहे. 


4. सबधाम (Sabdham):

हॉरर मिस्ट्री ड्रामाने परिपूर्ण असलेला हा चित्रपट सबधाम (Sabdham) शनिवारी, 28 मार्च 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अरिवझगन वेंकटचलम यांनी दिग्दर्शित आणि लिहिलेल्या 'सबधाम (Sabdham)' चित्रपटामध्ये आदि पिनिसेट्टी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. आदि या चित्रपटात, मुन्नारमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या गूढ मृत्यूंचा तपास करणाऱ्या अलौकिक तपासनीस असलेला रूबेनची भूमिका साकारत आहे. 


सम्बन्धित सामग्री