मुंबई: 2000 साली प्रसिद्ध हिंदी रिमेक 'काटा लगा' गाण्यातून तमाम रसिक-प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवाला वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अलिकडच्या काळात, मनोरंजन क्षेत्रातील तरुण कलाकारांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहेत. भारतीय अभिनेते आणि गायकांपासून ते आंतरराष्ट्रीय संगीतकार आणि खेळाडूंपर्यंत, हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंची यादी चिंतेचा विषय बनली आहे.
या सर्व मृत्यूंमध्ये एक सामान्य गोष्ट म्हणजे ते अनपेक्षित मृत्यू होत आहेत, ज्यासाठी ताणतणाव, अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि वैद्यकीय परिस्थिती कारणीभूत ठरत आहेत. अलिकडच्या काळात, तंदुरुस्त आणि निरोगी जीवनशैली जगणाऱ्या अनेक कलाकारही अनपेक्षित मृत्यूचे बळी पडले आहेत, जे चिंतेचा विषय बनत आहे.
हेही वाचा: 'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही'; नाव न घेता शिंदेंनी लगावला ठाकरेंना टोला
'या' कलाकारांना आला हृदयविकाराचा झटका:
शेफाली जरीवाला: 'कांटा लगा' गाण्याने लोकप्रिय झालेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचा शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ती घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथे मृत घोषित करण्यात आले. मात्र, शेफालीचा मृत्यू खरोखरच हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे की दुसरे काही कारण आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
सिद्धार्थ शुक्ला: बिग बॉस 13 चा विजेता आणि टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे 2 सप्टेंबर 2021 रोजी वयाच्या 40 व्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
पुनीत राजकुमार: कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे 29 ऑक्टोबर 2021 रोजी वयाच्या 46 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
केके (कृष्णकुमार कुन्नाथ): प्रसिद्ध गायक केके यांचे 31 मे 2022 रोजी कोलकाता येथे एका संगीत कार्यक्रमानंतर हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले.
राज कौशल: दिग्दर्शक आणि निर्माते राज कौशल यांचे 30 जून 2021 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
दिपेश भान: 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेतील 'मलखान'ची भूमिका साकारणारा अभिनेता दीपेश भान यांचा 2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हा ते 41 वर्षांचे होते.
राजू श्रीवास्तव: प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांना ऑगस्ट 2022 मध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि 21 सप्टेंबर 2022 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
सिद्धांत वीर सूर्यवंशी: टेलिव्हिजन अभिनेत्याचे 19 मे 2022 रोजी वयाच्या 46 व्या वर्षी जिममध्ये कसरत करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
चिरंजीवी सर्जा: दक्षिण भारतीय अभिनेता चिरंजीवी सर्जा यांचे 7 जून 2020 रोजी वयाच्या 35 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सतीश कौशिक: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेले सतीश कौशिक यांचे 9 मार्च 2023 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
हृदयविकाराच्या झटक्यामागे कारण काय?
तज्ञांच्या मते, अशा दुःखद मृत्यूंसाठी एक कारण देणे आव्हानात्मक असले तरी ताणाची वाढती पातळी, वाढत्या अपेक्षा, कोविडनंतरचे परिणाम, अस्वस्थ्य जीवनशैली आणि धूम्रपान यासारखे घटक हृदयविकाराच्या झटक्यासाठी जबाबदार आहेत.