Kunal Kamra Bigg Boss Offer: गेल्या काही दिवसांपासून विनोदी कलाकार कुणाल कामरा चांगलाचं चर्चेत आला आहे. कुणाल कामराने अलीकडेच मुंबईतील 'हॅबिटॅट स्टुडिओ'मध्ये एक कॉमेडी शो केला होता. शोदरम्यान त्यांनी 'दिल तो पागल है' या हिंदी चित्रपटातील 'भोली सी सूरत, आँखों में मस्ती' या प्रसिद्ध गाण्याचे विडंबन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर मोठा गोंधळ उडाला. तेव्हापासून कुणाल कामरा सतत चर्चेत आहे. आता त्याने 'बिग बॉस 19' मधील त्याच्या प्रवेशाबद्दल खुलासा केला आहे.
कुणाल कामराला बिग बॉसची ऑफर -
कुणाल कामराने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका व्यक्तीसोबतचा चॅट मेसेज शेअर केला आणि सांगितले की, त्याला बिग बॉसच्या पुढील सीझनमध्ये सामील होण्याची ऑफर मिळाली आहे. विनोदी कलाकार कुणाल कामराने त्याच्या इंस्टाग्रामवर बिग बॉसच्या कास्टिंग डायरेक्टरसोबतच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि म्हटले की, त्याला रिअॅलिटी शो बिग बॉसच्या पुढील सीझनसाठी संधी मिळाली आहे.
हेही वाचा - कुणाल कामराने ठोठावला मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा; FIR रद्द करण्याची केली मागणी
ऑफरवर कुणाल कामराची प्रतिक्रिया -
दरम्यान, कुणाल कामराने त्याच्या इंस्टाग्रामवर बिग बॉस शोच्या कास्टिंग डायरेक्टर म्हणून स्वतःची ओळख करून देणाऱ्या व्यक्तीसोबतची चॅट शेअर केली. त्या मेसेजमध्ये लिहिले होते, हा मेसेज बिग बॉसच्या कास्टिंग डायरेक्टरचा आहे. हे एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही तुमचा खरा उत्साह दाखवू शकता आणि मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकता. तू काय विचार करत आहेस? आपण बोलू शकतो का?
हेही वाचा - Kunal Kamra Controvercy: कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या; BookMyShow ने नावासह हटवला विनोदी कलाकाराचा कंटेंट
या संदेशाला उत्तर देताना कुणालने म्हटलं आहे की, 'मी मानसिक रुग्णालयात जाऊन माझ्या मानसिक आरोग्यावर उपचार करेन.' तथापी, कुणालने सलमान खानच्या राधे चित्रपटातील एका गाण्यावरील त्या संदेशाचा स्क्रीनशॉट इंस्टाग्रामवर शेअर केला. कुणालने स्पष्ट केले आहे की, तो बिग बॉसच्या पुढील सीझनमध्ये दिसणार नाही.