बॉलिवूड मध्ये जिच्या अनोख्या प्रोजेक्ट्स चा सिलसिला सुरू आहे अशी पाथब्लेझर अभिनेत्री सई ताम्हणकर ! फॅशन असो वा अभिनय सई कायम तिच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतेय आणि पुन्हा एकदा सई नव्या बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये झळकणार आहे.
सई डब्बा कार्टेल च्या ट्रेलर लाँच साठी खास अंदाजात दिसली आणि तिच्या या लूक ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या आधी देखील सईने अनेकदा कॉन्सेप्ट फोटोशूट केलं आहे आणि तिच्या या खास ओव्हरकोट लूक ने पुन्हा ती चर्चेत आली आहे. सई ने या ओव्हरकोट लूक मधून बॉस लेडी लूक क्रिएट केला आहे.
नेहमी विविधांगी भूमिका साकारणारी सई ताम्हणकर नेटफ्लिक्सच्या 'डब्बा कार्टेल'मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत असून ती पोलीस निरिक्षक प्रीती जाधव ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा: आदिनाथ कोठारे च्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शन असलेल्या पाणी ने पटकावले 7 पुरस्कार !
बॉलिवुड मध्ये देखील सई ने तिच्या अभिनयातील वेगळेपणा जपत सातत्यपूर्ण काम सुरूच ठेवलं आहे आणि येणाऱ्या काळात देखील ती अनेक बड्या बॉलिवुड प्रोजेक्ट्स चा महत्त्वपूर्ण भाग होणार असल्याच कळतंय.
क्राइम बीट, मटका किंग, ग्राउंड झीरो अश्या अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट मधून सई या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना दिसतेय.