Sunday, August 17, 2025 01:49:20 AM

कियारा आणि सिद्धार्थच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन; चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले असून आई-बाळ दोघेही सुखरूप आहेत. लग्नानंतर वर्षभरातच दोघे पालक बनल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

कियारा आणि सिद्धार्थच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण

Bollywood News: बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि चर्चित जोडप्यांपैकी एक असलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या घरी आनंदाचे गुऱ्हाळ झाले आहे. या ग्लॅमरस जोडप्याने आपल्या आयुष्यात एका गोंडस मुलीचे स्वागत केले आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे 2023 मध्ये भव्य विवाहसोहळ्यात विवाहबंधनात अडकले होते. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पार पडलेल्या त्यांच्या स्वप्नवत लग्नाची चर्चा संपूर्ण देशभर होती. लग्नानंतर दोघांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत फारशी उघड भूमिका घेतली नाही. मात्र यंदाच्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी आपल्या पहिल्या अपत्याच्या आगमनाची घोषणा सोशल मीडियावर करत चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला होता.

त्यांनी इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये दोघे मिळून बाळाच्या छोट्याशा सॉक्स धरताना दिसत होते. त्या फोटोखाली त्यांनी लिहिले होते; 'The greatest gift of our lives… Coming soon'. या घोषणेनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

हेही वाचा:Fitness Secret: बापरे! रोज 40 रोट्या, दीड लिटर दूध... तरीही 'या' अभिनेत्याचं वजन वाढलंच नाही,जाणून घ्या त्यामागचं कारण

सिद्धार्थ आणि कियाराची भेट पहिल्यांदा एका पार्टीत झाली होती. त्यानंतर त्यांच्या प्रेमाचा प्रवास ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर सुरु झाला. जरी त्यांनी त्यांच्या नात्याबाबत कधीच उघड वक्तव्य केले नव्हते, तरी त्यांच्या लग्नाने सर्व अफवांना पूर्णविराम दिला.

सध्या कियारा आणि सिद्धार्थ दोघांच्याही करिअरमध्ये मोठ्या संधी आहेत. सिद्धार्थ आगामी ‘परमसुंदरी’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात जान्हवी कपूरसोबत झळकणार आहे. तर कियारा यशराज फिल्म्सच्या भव्य ‘वॉर 2’ चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. कियाराने ‘डॉन 3’ मधून मात्र गरोदरपणामुळे माघार घेतल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत काम करणार होती.

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या घरी आलेल्या या नवा पाहुण्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्सुकतेचे वातावरण आहे. त्यांच्या वैवाहिक आणि वैयक्तिक आयुष्याच्या या नव्या पर्वाला सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'>SID KIARA BABY


सम्बन्धित सामग्री






Live TV