टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे हरियाणात! 12 पैकी 9 आरोपी सोनीपतचे; तपासाला नवं वळण

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सोनीपत कनेक्शन अधिकच घट्ट होत चालले आहे. मुंबई पोलिसांनी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखोडा भागातील रोहाना गावातून अमर नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
Tiger Shroff Firing Case
Tiger Shroff Firing Case

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या घरावरील गोळीबार प्रकरणात सोनीपत कनेक्शन अधिकच घट्ट होत चालले आहे. मुंबई पोलिसांनी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखोडा भागातील रोहाना गावातून अमर नावाच्या तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या 12 पैकी 9 आरोपी सोनीपत जिल्ह्यातील आहेत.

हेही वाचा- टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; सर्व आरोपींवर ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणात पोलिस तपासात आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे समोर आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, कुणालने अमरच्या खात्यात 40,000 रुपये पाठवले. कुणालच्या सांगण्यावरूनच अमरने आरोपी राधाच्या खात्यात 12,000 रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान, अमरच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

मुलाला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.  या बँक व्यवहारानंतरच पोलिसांना अमरपर्यंत पोहोचणे शक्य झाले.  आतापर्यंत समोर आलेल्या नावांमध्ये रेहान, फूल सिंग, सुमित, कुणाल, जतीन, समीर, अंकित, प्रांजल आणि आता अमर यांचा समावेश आहे. हा पैसा गोळीबाराच्या कटासाठी वापरला गेला का, याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version