नेटफ्लिक्सवरील (Netflix) वरील स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) ही वेब सिरीज जागतिक स्तरावर खूप लोकप्रिय झाली आहे. याचे 4 सीझन नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रचंड गाजलेत. या वेब सिरीजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, लवकरच याचा सीझन 5 देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) च्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहेत. मात्र, ज्यांनी अजूनही नेटफ्लिक्सवरील (Netflix) वरील स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) ही वेब सिरीज नाही पहिले, त्यांना सतत हा प्रश्न पडतो आणि ते म्हणजे स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) ही वेब सिरीज कोणत्या कारणांमुळे गाजत आहेत? चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या कारणांमुळे स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) ही वेब सिरीज लोकप्रिय ठरत आहेत.
1 - उत्कृष्ट कथा आणि 80 च्या दशकाची नॉस्टॅल्जिया:
स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) ही वेब सिरीज 1980 च्या दशकावर आधारित आहे. त्या काळातील विज्ञान-काल्पनिक (science fiction) आणि रहस्यमय (mystery) शैलीतील सिनेमांप्रमाणे या वेब सिरीजची मांडणी केली आहे. 80 च्या दशकातील संदर्भ, संगीत, पॉप संस्कृती (pop culture) आणि व्हिज्युअल्स यासारख्या गोष्टींमुळे प्रेक्षकांना जुन्या काळाची आठवण येते. ही वेब सिरीज विशेषतः त्या लोकांसाठी आकर्षक आहे, जे त्या दशकात वाढले आहेत. त्यासोबतच, नवीन पिढीलादेखील हा अनोखा अनुभव पाहायला मिळतो.
2 - रोमांचक आणि रहस्यमय कथा:
स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) ची कथा हवकिन्स, इंडियाना (Hawkins, Indiana) येथे घडते, जिथे एक लहान मुलगा गायब होतो. त्यामुळे अनेक रहस्यमय आणि अज्ञात घटना घडण्यास सुरुवात होते. अलौकिक शक्ती (supernatural elements), प्रयोगशाळेतील गुप्त प्रयोग, परग्रहवासीयांसारखी विचित्र प्राणी (Demogorgon), आणि अपसाईड डाउन (Upside Down) नावाची एक वेगळीच दुनिया दाखवल्यामुळे, प्रेक्षकांमध्ये उत्कंठा निर्माण होते.
3 - नेटफ्लिक्स (Netflix) चा अल्गोरिदम (Algorithm) आणि ट्रेंडिंग शो:
नेटफ्लिक्स (Netflix) चा अल्गोरिदम हा एआय (AI) वर आधारित आहे. त्यासोबतच, नेटफ्लिक्स (Netflix) प्रेक्षकांच्या पाहण्याच्या सवयींना निरीक्षण करतो आणि त्याच्या आधारित युझर्सना सुचवतो. स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) या वेब सिरीजला जास्त लोक पाहत असल्यामुळे आणि त्यासोबतच, या वेब सिरीजला चांगली प्रतिक्रिया मिळत असल्यामुळेदेखील ही वेब सिरीज गाजत आहे.