धर्मेंद्र प्रधान आक्रमक! राजीनाम्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया; CJP आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधत केला मोठा दावा

राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वारंवार सर्वसामान्य नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रासात लोटणे हाच काँग्रेसचा एकमेव उद्देश उरला आहे, असा गंभीर आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला.
dharmendra pradhan
dharmendra pradhan

Dharmendra Pradhan’s First Reaction after Resignation: माजी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया देत कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला चढवला आहे. देशहित, व्यवस्था परिवर्तन आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या नावाखाली सुरू असलेल्या या आंदोलनांचा खरा चेहरा आता देशासमोर उघड झाला आहे, असे सांगत प्रधान यांनी या आंदोलनांच्या मूळ हेतूवरच गंभीर शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या या अचानक आक्रमक भूमिकेमुळे सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वारंवार सर्वसामान्य नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रासात लोटणे हाच काँग्रेसचा एकमेव उद्देश उरला आहे, असा घणाघात धर्मेंद्र प्रधान यांनी केला.

‘विद्यार्थ्यांच्या नावाखाली देशात अराजकता पसरवण्याचे सुनियोजित षडयंत्र’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर सविस्तर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, आंदोलनाच्या नावाखाली उघडपणे सत्ता परिवर्तन आणि बांगलादेशातील घटनांपासून प्रेरणा घेतल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावरून देशात राजकीय अराजकता पसरवण्याचे हे एक अत्यंत सुनियोजित षडयंत्र आहे. विदेशी शक्तींच्या बळावर सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, भारतात केवळ लोकशाही प्रक्रियेतूनच सत्ता परिवर्तन होते आणि देशातील सुजाण जनता अशा अलोकतांत्रिक विचारांना कधीही स्वीकारणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा – ‘CJP च्या आंदोलनामागे एलॉन मस्क…’; भाजपच्या माजी खासदाराच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण

काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल; जनादेशाचा अपमान करत असल्याचा आरोप
या संपूर्ण प्रकरणावरून प्रधान यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. निवडणुकीमध्ये मनासारखा निकाल किंवा अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्याने राहुल गांधी वारंवार जनतेच्या जनादेशाचा अवमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर आता थेट निवडणूक प्रक्रिया आणि देशातील प्रमुख लोकशाही संस्थांवरच अविश्वास निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून केला जात असल्याची टीका त्यांनी केली. देशाच्या इतिहासात याच विचारधारेने वेळोवेळी लोकांच्या हक्कांना आणि अधिकारांना चिरडण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता देशातील नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या राजकारणापासून सावध राहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरणाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे
संविधानाची प्रत हातात घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधींना देशातील जनतेने निवडणुकीत अनेकदा सपशेल नाकारले आहे, असे सांगत प्रधान म्हणाले की, त्यानंतरही केवळ सत्तेच्या लालसेपोटी ते सातत्याने जनादेशाचा अनादर करत आहेत. संवैधानिक संस्थांच्या कार्यक्षमतेवर नाहक प्रश्नचिन्ह उभे करून लोकशाहीच्या मर्यादांना नख लावण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधींचा लोकशाही आणि राजकीय व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत लज्जास्पद असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेवर ताशेरे ओढले.

हेही वाचा – प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत मोठी वाढ; न्यायालयाने थेट घरावर…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version